news today, यंदा दिवाळीत आनंदाचा शिधा नाही - ना.भुजबळ

लाडक्या बहिणींमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण 


मुंबई - दसरा दिवाळी अशा सणांमध्ये गेली दोन वर्षे सरकारच्यावतीने देण्यात येणारा 'आनंदाचा शिधा यंदा वितरीत केला जाणार नाही. सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असून लाडकी बहीण योजनेसाठी 45 कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही.असे राज्याचे अन्न व.नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता.04) स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू झाली.2022 च्या दिवाळीला पहिल्यांदा या 'किट' चे वाटप करण्यात आले.त्यात एक किलो चना डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल या वस्तूंचा समावेश होता.2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गौरी गणपती आणि दिवाळीनिमित्त तसेच 2024 मध्ये अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने आनंदाचा शिधा वाटला होता.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडला असून आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानेच दसरा दिवाळी अशा सणांमध्ये गेली दोन वर्षे सरकारच्यावतीने देण्यात येणारा आनंदाचा शिधा यंदा वितरीत केला जाणार नाही.यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा वितरीत होणार नसल्यामुळे गोरगरीबांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

Post a Comment

0 Comments