news today, जिल्हा सहकारी बँकेत 53 पात्र अनुकंपाधारकांना नियुक्ती पत्र

छ्त्रपती संभाजीनगर ता.18 - छ्त्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँकेत अनुकंपाधारक पात्र 52 उमेदवारांना नोकरीचे नियुक्ती पत्र बँकेचे संचालक, आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी (ता.15 ऑगस्ट) रोजी हा कार्यक्रम पार पडला.


या प्रसंगी बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे पाटील,उपाध्यक्ष किरण पाटील,संचालक कृष्णा पाटील डोणगांवकर, आप्पासाहेब पाटील, डॉ.दिनेश परदेशी, सुहास शिरसाट, जगन्नाथ काळे, प्रभाकर काळे, रामहरी जाधव, रामदास पालोदकर, बँकेचे सरव्यवस्थापक अजय मोटे,अण्णासाहेब वडेकर, कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव गाढे, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष एस. वाय. डकले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments