बाभूळगाव परीसरातील गावांचा संपर्क तुटला
वैजापूर, ता.30/ प्रतिनिधी - गारज परीसरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढेकु नदीला पुर आला आहे. या पुरामुळे बाभुळगाव येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
ढेकु नदीच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे सायंकाळी ढेकुला पुर आला. या पुराचे पाणी बाभुळगाव येथील पुलावरुन वाहत आहे. त्यामुळे या परीसरातील बाभुळगाव, पाथरी, धोंदलगाव, गारज येथे येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहे..ढेकु नदीवरील भटाणा धरण 67 टक्के भरले आहे.2019 नंतर पहिल्यांदाच या धरणात इतका पाणी साठा झाला आहे.
0 Comments