news today, विनायकराव पाटील महाविद्यालयात एचआयव्ही जनजागृती कार्यशाळा


वैजापूर, ता.30/ प्रतिनिधी - येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही.एड्सबाबत जनजागृती व्हावी.त्याची लक्षणे, उपाय तसेच निदान झालेल्या व्यक्तीच्या मानवाधिकार आणि घटनात्मक हक्कांसाठी संपूर्ण देशभर लागू झालेल्या 10 सप्टेंबर 2018 च्या कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी यांनी दिलेल्या सुचनेच्या अधीन राहून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, संभाजीनगर  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथक, उपजिल्हा रुग्णालय वैजापूर व विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या एन.एस.एस (राष्ट्रीय सेवा योजना)यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

आंतरराष्ट्रीय युवादिन बाबतही यावेळी माहिती देण्यात आली.या प्रसंगी जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या आजाराची सखोल माहिती देऊन त्यात या आजाराबाबत लक्षणे,घ्यावयाची काळजी,व आजार झाल्यास उपाय योजनांची सविस्तर माहिती दिली. लग्नाआधी दोघांनीही चाचणी करून मगच लग्न करावे असा सल्ला ही राजपूत यांनी युवक व युवतींना दिला, उपजिल्हा रुग्णालयाचे आयटीसीटी विभागाचे प्रमुख विजय पाटील यांनीही तालुक्यात दोन हजार रुग्ण बाधित असून ते उपचार घेत आहेत असे सांगितले. 

महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.जी.लोणे यांनी कार्यक्रम सामारोप केला. या प्रसंगी राहुल माने, श्रीमती पाटणी, प्रा. एम.जी.राठोड, प्रा.चोरधडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे बापू वाळके यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments