news today, वैजापूर पंचायत समितीसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

प्रकल्प अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर 

वैजापूर, ता.  30/प्रतिनिधी - गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली पोषण आहाराची बिले मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता.2) पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आयटक सलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने राज्य सचिव कॉम्रेड शालिनी पगारे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. वैजापूर तालुक्यातील सात बीट मधील पोषण आहाराची बिले 14 महिन्यापासून मिळाली नसल्याने संतप्त अंगणवाडी सेविकांनी यावेळी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांना आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
पोषण आहाराची थकीत बिले मिळावी, दोन वर्षापासूनची थकीत प्रवास देयके मिळणे, लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता मिळणे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात शोभा तांदळे, शबाना शेख, कल्पना माळी,  पंचशीला धनेश्वर, सोनी चव्हाण, नंदा ठेंगडे,  बिजला काळे, संजीवनी पंडागळे, रत्ना गोंधळे, निर्मला बोरगे, सुनिता बोढरे, मंदाकिनी जाधव, सुरेखा साळुंके, संगीता बत्तीशे, मनीषा बागुल, लीला बागुल, छाया माने यांचसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या आंदोलनात सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments