news today, वैजापुरात लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन

वैजापूर, ता.28/- प्रतिनिधी - अख्या मराठी मनाचा लाडका देवता असलेल्या गणपती बाप्पांचे बुधवारी (ता.27) वाजत गाजत मंगलमय वातावरणात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपात आगमन झाले..शहर व तालुक्यात गणपती बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र आनंद आणि उत्साहाला उधाण आले होते.


गणपती बाप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया !! असे म्हणत, गुलाल उधळत,व ढोल ताश्याच्या आवाजात, कपाळी गणपती बाप्पाची पट्टी बांधत तरुण व बालगोपाल मंडळींनी नाचत, घोषणा देत बाप्पाच्या मूर्तींची स्थापना करून बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले..बाप्पाच्या मूर्तीवर पावसाची सर ही आली, तरी उत्साहात बाप्पाचे वाजत गाजत भक्तांनी स्वागत केले. नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष डॉ, दिनेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, सचिन राऊत, थेटे पाटील, जयपाल राजपूत यांच्याहस्ते आरती होऊन बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 
या प्रसंगी सर्व कर्मचारी उपस्थित होते.  

शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर व बाल संस्कार केंद्रात माजी  नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी व सौ. शिल्पाताई परदेशी यांच्याहस्ते श्री स्थापना व पूजा आरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सचिन वाणी, माजी नगरसेवक लिमेश (बापू) वाणी, जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत, ,देविदास वाणी, पत्रकार घनश्याम वाणी, अशोक पवार खंडाळकर, बापूसाहेब गावडे, सी.के.पवार, अनिता देविदास वाणी, सुमनबाई आलूले, राजेंद्र साळुंके,, उत्तमराव साळुंके यांच्या उपस्थितीत आरती करून "श्री"मूर्तीची स्थापना करण्यात आली. 

शहर व तालुक्यात अत्यंत आनंद व उत्साहात "श्री"चे आगमन झाले. या वर्षी शहरात सर्व गणेश मंडळात आरास सजावटीची स्पर्धा दिसून येत आहे. सर्वत्र आकर्षक आरास व विद्युत रोषणाईने  सजावट करण्यात आली आहे .पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे प्रमुख पो.कॉ. ज्ञानेश्वर मेटे यांच्यानुसार त्यांच्याकडे सायंकाळपर्यंत 55 गणेश मंडळांनी  परवानगी घेतलेली असल्याची नोंद आहे. रात्री उशिरापर्यंत परवानगी साठी मंडळाचे अर्ज येत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे व पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी शहर व ग्रामीण भागात जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

बुधवार (ता.27) दुपारपर्यंत वैजापूर तालुक्यात जवळपास 102 गणेश मंडळांनी श्री स्थापनेसाठी पोलीस प्रशासनाकडे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात तीस व ग्रामीण भागात 21, शिऊर हद्दीत 40 व विरगाव पोलीस ठाणे हद्दीत 22 असे एकूण 102  गणेश मंडळांनी श्री.स्थापनेसाठी अर्ज केले आहेत. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी रक्तदान व शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिक विषय सलग्न उपक्रम राबवावे असे आवाहन आमदार रमेश पाटील बोरणारे व भाजपाचे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केले आहे



Post a Comment

0 Comments