news today, मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचे रस्त्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन


                   मराठा सेवक सतीश देशमुख 

जुन्नर, ता .28 - जरांगे पाटील यांच्या सोबत किल्ले शिवनेरीकडे जाताना केज तालुक्यातील मराठा आंदोलक सतीश न्यानोबा देशमुख (वय 40 वर्ष ) यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांचात्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.मनोज जरांगे यांनी जुन्नर येथील रुग्णालयात जाऊन सतीश देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार.....मनोज जरांगे 

आमच्या एका बांधवाला प्रवासात असताना हृदयविकाराचा झटका आला. याला जबाबदार फडणवीस आहेत. तुम्ही जर आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. असे जरांगे पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जुन्नर येथील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले...





Post a Comment

0 Comments