news today, आंदोलनात सहभागी होण्यासाठी वैजापूर तालुक्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे

मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांच्यासह हजारों मराठा सेवकांचा आंदोलनात सहभाग 

वैजापूर, 27 / प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लढा उभारला असून मराठा समाजाच्या माध्यमातून 29 ऑगस्टला 'मुंबई चलो' चा नारा देण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांच्यासह हजारो मराठा बांधव आज दुपारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी जातांना मराठा सेवक प्रशांत पाटील यांचे त्यांच्या पत्नीने औक्षण केले.

मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला निघाले. तेंव्हा त्यांचे औक्षण करताना त्यांच्या पत्नी

मराठा सेवक प्रशांत पाटील संपूर्ण तालुक्यात मराठा समाजातील बांधवांसोबत बैठका घेऊन जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी (ता.27) वैजापूर तालुक्यातून 5 हजार मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी जातांना मराठा बांधवांनी जल्लोष केला.

आज सकाळी वैजापूर शहरातील द्रौपदी लॉन येथे शहर व तालुक्यातील खंडाळा, बोरसर, शिऊर, लोणी खुर्द, महालगाव, परसोडा, धोंदलगाव, लासूरगाव, भऊर आदी गावांतून  मोठ्यासंख्येने आलेले मराठा बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमा झाले. तेथून विविध वाहनातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले. माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी मराठा बांधवांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. 

    मुंबईला आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमा झालेले        मराठा बांधव ...





Post a Comment

0 Comments