बीड, ता.27 - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी असंख्य समाज बांधवांसह आज सकाळी अकरा वाजता मुंबईच्या दिशेने कूच केली असून प्रवासादरम्यान त्यांनी अंकुशनगर येथे आपल्या परिवाराची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. जरांगे यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
अंतरवाली सराटी गावातून बाहेर पडल्यानंतर हजारो मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांना चूक झकायची आहे म्हणून देवदेवतांना पुढे करताहेत.त्यांना सांगून चार महिने झाले निर्णय झाला नाही आता देवदेवतांना पुढे करून त्यांच्या आडून गरीब मराठ्यांवर अन्याय केला जात आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. अटी व शर्तीसह एक दिवसासाठी ही परवानगी देण्यात आली आहे.
0 Comments