मुंबई, ता.30 - महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आक्रमक नेते अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ शुक्रवारी (ता.29) संपला.
विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अत्यंत आक्रमक, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत सर्वपक्षीय लक्ष वेधले. शेतकरी असो वा युवा, कामगार असो वा सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण भागातील समस्या असोत वा शहरी प्रश्न — प्रत्येक ठिकाणी त्यांनी सरकारला धारेवर धरत जनतेचा आवाज बुलंद केला.
आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा कार्यकाळ संपत असला तरी त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव, आक्रमक उपस्थिती आणि मुद्देसूद कामगिरी यामुळे जनतेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आगामी काळात ते निश्चितच आणखी प्रभावीपणे विधिमंडळात पुनरागमन करतील व आपल्या कार्याने महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवतील, याचा दृढ विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली.
0 Comments