पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व त्यांच्या पथकाची कारवाई
वैजापूर, तर.12 / प्रतिनिधी - वैजापूर शहरातील येवला नका परिसरात असलेल्या 'आय लव्ह कॅफे' शॉपवर पोलिसांनी सोमवारी दुपारी तीन वाजेला छापा टाकून सहा तरुण व तीन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी कॅफे चालकाला नोटीस बजावण्यात आली असून यापुढे कॅफेच्या नावाखाली असे गैरप्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी दिला आहे.
शहरातील येवला नाका परिसरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या कॅफेत महाविद्यालयीन तरुण व तरुणींना दोनशे ते पाचशे रुपये प्रति तास आकारून प्रायव्हसीच्या नावाखाली स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला जात असून या ठिकाणी तरुण तरुणींचे गैरप्रकार वाढले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कॅफेवर छापा टाकून ही कारवाई केली.
कॅफे शॉप मध्ये स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिले जात ..
शहरात महाविद्यालयासोबतच विविध शिकवणीचे वर्ग आहेत. यामुळे तालुक्यातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. तरुण-तरुणींची संख्या वाढल्याने शहरात कॅफे देखील आहे. मात्र यापैकी अनेक कॅफेमध्ये कॅफेचालक प्रायव्हसीच्या नावाखाली स्वतंत्र व्यवस्था करून देतात. यासाठी दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत प्रती तास पैसे उकळले जातात तसेच या कॅफे शॉपमध्ये स्वतंत्र कक्ष उपलब्ध करुन दिले जात असल्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत. यातून वाढणारे गैरप्रकार लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येवला रोडवरील महाविद्यालय परिसरात असलेल्या 'आय लव कॅफे' शॉपवर छापा मारला असता सहा तरुण व तीन तरुणी कॅफेमध्ये आढळून आले. यात काही मुलं-मुली जोडपे ने बसलेली होती. पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात आणून संबंधित मुलांच्या आई वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर तरुण-तरुणींना समज देत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.तसेच कॅफे चालकावर कारवाई करून त्यास नोटीस बजावण्यात आली असून त्यास स्वतंत्र कक्ष बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा झाली, अनेक महाविद्यालयीन तरुण पोलीस ठाणे आवारात जमा झाले होते तर बघ्यांची देखील मोठ्यासंख्येने गर्दी झाली होती.सदरील कारवाई पोलीस उप निरीक्षक नागरगोजे, भुरे, नरवडे, कुऱ्हाडे यांच्या पथकाने केली.
0 Comments