news today, वैजापूर शहर व तालुक्यात 14 ऑगस्टला 'कन्या सन्मान दिन' साजरा करणार - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदुरकर


वैजापूर ता.12/ प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी म्हणजे गुरुवार ता.14 रोजी वैजापूर शहर व तालुक्यातील महसूल मंडळ मुख्यालय असलेल्या गावात आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "कन्या सन्मान दिवस"साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कन्या रत्न सन्मान ,पीसीपीएनडीटी अंतर्गत माहिती देणे तसेच आरोग्य विषयक माहिती देणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ गुरुनाथ इंदुरकर यांनी दिली.

शहरासह तालुक्यातील महसूल मंडळ असलेल्या खंडाळा, शिवूर, गारज, लासुरगाव, महालगाव, बाबतरा, नागमठाण, लोणी खुर्द, बोरसर, घायगावव जानेफळं येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या अकरा गावात त्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून कन्या सन्मान दिवस व इतर आरोग्य माहिती द्यावी. अशा सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुरुनाथ इंदूरकर यांनी संबंधिताना दिल्या आहेत. वैजापूर येथेही "कन्या सन्मान दिन" गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे .तहसीलदार सुनिल सावंत यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत ही माहिती डॉ.इंदूरकर यानी दिली. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.बी.एन.मोरे व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत, एम. टी.शिरसाट, बापू वाळके, उपजिल्हा रुग्णालयाचे श्री.चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. 
 
 

Post a Comment

0 Comments