news today, भक्ती आणि सेवा हाच खरा धर्म - हभप मधुसूदन महाराज


 मधुसूदन महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाने सप्ताहाची सांगता ; पुढील सप्ताहाचा नारळ परसोडा ग्रामस्थांना 

लोणी खुर्द ता.06/प्रतिनिधी.-  वैजापूर तालूक्यातील तलवाडा येथे सुरू असलेल्या संत बहिणाबाई  फिरता नारळी सप्ताहाची मंगल सांगता ह.भ.प. मधुसूदन महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाने झाली. भक्तीभावाने भारलेल्या या सांगता सोहळ्याला परिसरातील हजारो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
ह.भ.प मधुसूदन महाराजांनी आपल्या कीर्तनातून संत बहिणाबाईंच्या जीवनातील शिकवणी, भक्तीचा मार्ग आणि समाजासाठी त्यांनी दिलेला संदेश प्रभावीपणे उलगडला. “भक्ती आणि सेवा हाच खरा धर्म आहे” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. महाराजांनी सहज, रसाळ आणि ओघवत्या शैलीत वारकरी परंपरेचे महत्त्व पटवून दिले.

सप्ताहात महिलांचा, युवकांचा आणि बालवर्गाचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सप्ताहभर भजन, प्रवचन, गाथा पारायण, हरिपाठ, आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वंयम सेवकांनी केले, तर स्थानिक ग्रामस्थ, वारकरी मंडळी आणि भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले.

संत बहिणाबाईंच्या कार्यातून समाजात प्रेम, सहिष्णुता आणि शुद्ध आचारधर्माची प्रेरणा मिळावी, हीच सप्ताहामागची भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले.सांगता सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती होती.

       पुढील वर्षीच्या फिरता नारळी सप्ताहाचा नारळ                        स्वीकारताना परसोडा येथील ग्रामस्थ

श्री संत बहिणाबाई महाराज फिरता नारळी सप्ताह पुढील वर्षी परसोडा येथे होणार आहे. 2026 च्या सप्ताहाचे श्रीफळ (नारळ) ह.भ.प मधुसुधनजी महाराज (संत बहिणाबाई महाराज संस्थान शिवूर) यांनी परसोडा ग्रामस्थांना दिले. सप्ताहचे नारळ दिल्याबद्दल परसोडा ग्रामस्थांच्यावतीने महाराजांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय पाटील बोरनारे, भागिनाथ मगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments