news today, मराठा आरक्षणासंदर्भात न्या. शिंदे समितीची वैजापूरला भेट


वैजापूर, ता .20 / प्रतिनिधी -  मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने  मंगळवारी(ता.20) वैजापूर येथे भेट देऊन मराठा आरक्षणासंदर्भात होत असलेल्या प्रशासकीय कामांचा आढावा घेतला तसेच तेथील रेकॉर्डची पाहणी केली. कक्ष अधिकारी विष्णू मोहळकर यांनी भेट दिली. यावेळी मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांनी मोहळकर यांची भेट घेतली तसेच मराठा आरक्षणासंदर्भात वैजापूर तालुक्यात सुरु असलेल्या कामाची सविस्तर माहिती सांगितली.


तालुक्यात कुणबी नोंदी तहसील कार्यालयात, भुमि अभिलेख कार्यालय, रजिस्टर कार्यालय या ठिकाणी उपलब्ध असून नोंदी नमुना नंबर 13 वस्ती  व गुरे पत्रक, नमुना नंबर 14 जन्म मृत्यू नोंदी, नमुना नंबर 6 कापणी पत्रक, गहाण खत, नमुना नंबर 33 खाणे सुमारी नकाशा इसमाचे नाव व घरे जात लिहण्या बद्दल), खाणे सुमारी नमुना नंबर 34 घराचे धाबे व जात लिहण्या बद्दल, शैक्षणिक अभिलेख उप प्रकार (प्रवेश निर्गम नोंद वही), पक्काबुक - भुमि अभिलेख विभाग, खरेदीखत नोंदणी, भाडेपट्टा, गहाणखत, जमिन खरेदी विक्री, साक्षीदार अभिलेख्यात सापडलेची माहिती सदाफळ यांनी मोहळकर यांना दिली. या कामाबाबत मोहळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments