छत्रपती संभाजीनगर ता.20 - सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. बँकेचे संचालक तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते बागडे यांचा वाढदिवसानिमित्ताने (मंगळवारी ता.19) जिल्हा सहकारी बँकेत सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी आ.अनुराधा चव्हाण, बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, संचालक डॉ.दिनेश परदेशी, कृष्णा पाटील डोणगांवकर, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ काळे, जावेद पटेल, सुहास शिरसाठ, डॉ.मनोज राठोड, डॉ सतीश गायकवाड, माजी आमदार अण्णासाहेब माने, रामहरी जाधव, केशवराव तायडे, राधकिसन पठाडे,विनोद मंडलेचा, देविदास पालोदकर, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, पुंडलिक काजे, शिवाजीराव पाथ्रीकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल बागडे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक असून बँकेचा एनपीए कमी आहे. निस्वार्थपणे काम केल्यास सहकार क्षेत्र अधिक वाढते. केंद्र शासनाने विविध कार्यकारी सोसायट्यांना बळ देण्यासाठी विविध व्यवसाय करण्याची जोड देखील दिल्याचे सांगत सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी मतभेद व हेवेदावे बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. आ.अब्दुल सत्तार, आ .अनुराधा चव्हाण, डॉ.दिनेश परदेशी यांनी आपल्या भाषणात बागडे यांच्या कार्याचा गौरव केला. राज्यपाल बागडे यांचे कार्य आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.
0 Comments