राजपूत आपली कविता बैल पोळा विद्यार्थ्यांनाशिकवतांना
वैजापूर, ता.20 / प्रतिनिधी -साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांची इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात त्यांनी लिहिलेली "बैल-पोळा" ही कविता विद्यार्थी गेल्या दहा वर्षापासून शिकत आहेत. येत्या शुक्रवारी "बैल-पोळा" सण असून या अनुषंगाने येथील सेंट मोनिका इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या प्रमुख शिल्पाताई परदेशी व प्राचार्य किशोर साळुंके यांनी राजपूत यांना त्यांची कविता शिकविण्यासाठी शाळेत निमंत्रित केले होते.. .
धोंडीरामसिंह राजपूत यांनी आपली कविता "बैल-पोळा" शाळेतील विद्यार्थ्यांना टाचन-पाठ काढून शैक्षणिक अध्ययन -अध्यापन पद्धतीने शिकविली.प्रत्यक्ष कवितेचे कवी वर्गात येऊन कविता शिकवीत आहेत हे पाहून विद्यार्थी खूप आनंदीत झाले..कवी आपली कविता प्रत्यक्ष वर्गात येऊन शिकवीत आहे हा अनुभव विद्यार्थ्यांना अतिशय आनंद देणारा होता.
0 Comments