वैजापूर ता.16 /. प्रतिनिधी -संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सव वर्षानिमित्त नगरपालिका व नगर परिषद शाळा यांच्यावतीने शुक्रवारी (ता.15) संत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती व ज्ञानेश्वरी ग्रंथ यांची शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी पांच वाजता ठक्कर बाजार व मौलाना आझाद विद्यालय येथून ही मिरवणूक काढण्यात आली. माऊली मूर्ती व ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, पालिकेचे शिक्षण पर्यवेक्षक बी.बी.जाधव, नगर परिषदचे भांडारपाल श्री मुळे, मुख्याध्यापिका नीता पाटील, स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, वाल्मिक शेटे, अशोक पवार खंडाळकर यांच्या उपस्थितीत झाले.
शोभा मिरवणूक स्टेशन रस्ता व संकट मोचन मंदिर मार्गे पालिका कार्यालयात पोहचल्यानंतर तेथे समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या शोभा मिरवणुकीत संत बहिणाबाई वारकरी संप्रदाय संस्था भगगाव येथील ह.भ.प. रामेश्वर महाराज सोनवणे, कृष्ण महाराज इंगळे व त्या संस्थेचे वारकरी मुलं व मुली यांचा सहभाग होता. त्यांची पावली, त्यांचे टाळ -मृदुग, ज्ञानोबा माऊली, भजन व तालबद्ध टाळ यांनी संपुर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
नगरपालिकेच्यावतीने पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी भाववत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, पालिकेच्या शाळेचे शिक्षक, नगर परिषद कर्मचारी व शहरातील जेष्ठ नागरिक यांनी यात सहभाग नोंदविला. ह.भ.प. सोमवंशी महाराज, सुभाष गोमलाडू, अरुण कुलकर्णी, गणेश टिभे, शंकर जोरे, दीपक शिंदे, जयपालसिंह राजपूत, संतोष रत्नपारखी, सुवर्णा बोर्डे, वैशाली पगारे, सोमासे, खैरनार यांच्यासह शाळा शिक्षकांचा सहभाग होता.
0 Comments