वैजापूर ता.16 / प्रतिनिधी - शहरातील यशवंत कॉलनीतील श्रीकृष्ण मंदिरात मंदिर स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्ष व भगवान श्रीकृष्ण जयंतीनिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.15) भगवान श्रीकृष्ण जयंती दिनी या कथेचा समारोप होऊन भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत आनंद व उत्साहात संपन्न झाला. भागवत कथाकार ह.भ.प. उत्तम महाराज गाडे यांच्या अमृतमय वाणी आणि त्यांचे सहकारी यांच्या संगीतमय गोड वाणीतून शहरातील भक्त भाविकांनी भागवत कथेचा लाभ घेतला.
तालुक्यातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे व त्यांच्या परिवाराने या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. समारोपीय दिनी भाऊसाहेब पाटील.ठोंबरे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम, सामाजिक कार्यकर्ते .लधोंडीरामसिंह राजपूत, बोरसरचे सरपंच अरुण होले, उत्सव समिती अध्यक्ष डॉ. नितेश शहा, छगनराव दारूटे, अशोक पेहरकर, गुलाबराव पवार, पी.जी.पवार यांनी महाराजांचे पूजन केले. या प्रसंगी रामकृष्ण साठे, बबनराव डोंगरे, शशिकांत भालेराव, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र जानराव, श्री.वाघचौरे यांच्यासह यशवंत कॉलनीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .सायंकाळी ह.भ.प. उत्तम महाराज गाडे यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
0 Comments