news today, राज्यातील 14 हजार 661 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांचे कांदा अनुदान

मुंबई, ता.16 - राज्यात 2023 मध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना 200 क्विंटलच्या मर्यादेत प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. या योजनेतील काही अर्ज प्रलंबित होते.अशा 14 हजार 661 शेतकऱ्यांना 28 कोटी 32 लाख 30 हजार 507 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुदानाचा नाशिक जिल्हयाला सर्वाधिक लाभ होणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार, पणन विभागाने परवाना दिलेले खरेदीदार आणि नाफेडला 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल  350 रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
 जास्तीत जास्त 200 क्विंटलच्या मर्यादेत हे अनुदान दिले गेले आहे. त्यावेळी अनुदान देताना सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसल्यामुळे काही शेतकरी अपात्र ठरले, त्यांच्या प्रस्तावांची फेरछानंनी करण्यात आली. त्यानुसार 14 हजार 661 शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी 28 कोटी 32 लाख 30 हजार 507 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments