today news, मन्याड प्रकल्प 100 टक्के भरले ; सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे.

जिवंत पाणीसाठा असलेले मराठवाड्यातील एकमेव मन्याड प्रकल्प  ; दहा ते बारा गावांतील 1500 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा 

हसन सय्यद 
-----------------------
लोणी खुर्द ता.16 - वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील भादली ,पाराळा येथील मन्याड प्रकल्प हा मराठवाड्यातील जिवंत पाणी साठा असलेला एकमेव प्रकल्प असून पावसाच्या पाण्यासोबतच जिवंत पाण्याच्या झऱ्यांमुळे प्रकल्पाची पाणी पातळी तळाशी जात नसल्याची माहिती परिसरातील जाणत्यांनी दिली. प्रकल्प आज  शंभर टक्के भरला असून सांडव्यातून पाणी वाहत असल्याने मन्याड खोरे सध्या निसर्गाने नटलेले आहे. परिसरात झरे व धबधबे ओसंडून वाहत आहे .हे मन्याड खोरे जणू निसर्गप्रेमींना साद घालत आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. परंतु यंदा  परिसरात फारशी गर्दी नाही.अनेक गावाची तहान भागवणारा तलाव हा परिसरासाठी संजीवनी ठरला आहे. परंतु ह्या संजीवणी कडे पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे.मन्याड धरण हे पाऊण टी.एम. सी.चे धरण आहे..

   मन्याड धरण 100 टक्के भरले असून पाणी सांडव्याद्वारे         ओसंडून वाहत आहे...(छायाचित्रे - हसन सय्यद)


...या गावांना पाणीपुरवठा ..

भारत निर्माण योजनेअंतर्गत लोणी खुर्द, तलवाडा ,भादली, पाराळा, निमगाव, चिकटगाव, खरज, टुनकी आदी गावांना पाणीपुरवठा व सिंचनाची सोय आहे. 1500 हेक्‍टर जमीन या पाण्यामुळे सिंचनाखाली येते .

...ही आहे वैशिष्ट्ये ..

मन्याड धरण हे चारी बाजूंने डोंगरदऱ्यांनी वेढलेले असल्याने येथे वर्षाच्या बाराही महिने डोंगरातील पाण्याचे जिवंत झरे सुरू असतात. प्रकल्पात केवळ पावसानेच नाही तर या जिवंत  झऱ्याचे पाणी  सुरू असल्याने प्रकल्प कधी तळाशी गेलेला नाही.


झाडाझुडपांचा विळखा.....

वैजापुर तालुक्यातील जलस्त्रोताचा केंद्रबिंदू म्हणून ज्या धरणाकडे बघितले जाते, ते म्हणजे मन्याड धरण परंतु आज या धरणाला काटेरी कुंपणाने वेढले असून मन्याड साठवण तलाव हा जंगली झाडाच्या विळख्यात सापडला आहे. ...

... शुभ्र फेसाळणारे धबधबे ....

पावसाळा सुरू झाला की कळतनकळत पावले वळतात ती निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद लुटण्यासाठी त्यामुळे पावसात कधी धबधब्यांच्या ठिकाणीही डोंगरदऱ्यांत फिरून विकेंड मौजमस्ती साठी तरुणाई पर्यटनस्थळी निघते. या तरुणाईला वेड लागेल असे निसर्ग सौंदर्य वैजापूर तालुक्यातील मन्याड खोऱ्याला लाभले आहे....

Post a Comment

0 Comments