वैजापूर, ता.16 / प्रतिनिधी - शहरातील करुणा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षीस वितरण केले
या प्रसंगी शाळेत विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले. 1963 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सन 2000 पासून उच्च माध्यमिक शिक्षण पासून सुरु झाले असून शाळेत सद्या एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशी माहिती प्रास्ताविकात देण्यात आली. यावेळी करुणा निकेतन मुख्याध्यापक डॉ. संजय ब्राह्मणे, श्री. बोधक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते ॲड. प्रतापराव निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते तथा जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, माजी सभापती एल.एम.पवार, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, माजी शहर अध्यक्ष अशोक देवकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी करुणा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावी वर्गातील गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. प्रथम बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस नबी पटेल यांच्याकडून, द्वितीय बक्षीस गटनेते तथा जिल्हा उपाध्यक्ष विशाल पाटील शेळके यांच्याककडून, तृतीय बक्षीस जिल्हा उपाध्यक्ष रमेश आण्णा चोभे यांच्याकडून देण्यात आले
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शिवप्रसाद डमाळे, अल्पसंख्याक विभाग तालुका अध्यक्ष जावेद शेख, युवक विधानसभा अध्यक्ष नितीन तांबे, युवक कार्याध्यक्ष शुभम पाटील वाघ, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष रमेश शिनगारे, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष दिनेश त्रिभुवन, युवक शहर अध्यक्ष साईराज खरे यांच्यासह शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments