पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, पोलीस उप अधीक्षक भागवत फुंदे, मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, माजी उपनगराध्यक्ष अकील सेठ, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना आ.बोरणारे यांनी शहरात सर्वधर्मीय नागरीक एकोप्याने राहतात असे सांगत गणेशोस्तव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी प्रशासनाला सहकार्य करतील अशी ग्वाही दिली. तर पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी, निसर्गपुरक असा गणेशोस्तव साजरा करण्याचे आवाहन करत यंदा गणेश विसर्जनासाठी प्रायोगिक तत्त्वावर चार कृत्रिम तलाव उभारणार असल्याची माहिती दिली. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, पोलीस उप अधीक्षक भागवत फुंदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
शांतता समितीच्या या बैठकीस शिवसेनेचे तालुकप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा, काझी हाफीजोद्दीनं, माजी नगरसेवक शैलेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत शिंदे, रणजित चव्हाण, आवेज खान, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब, वाघमोडे, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments