वैजापूर ता.15 / प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्यदिन वैजापूर शहर व तालुक्यात शुक्रवारी (ता.15) उत्साहात संपन्न झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पार पडला उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याहस्ते ध्वजारोहण सम्पन्न झाले. तर तहसील कार्यालयात तहसीलदार सुनिल सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे, पंचायत समितीत गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, नगर पालिकेत प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत, हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात स्वातंत्र्य सैनिक वीरपत्नी कमलबाई गणपतराव लोंढे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी सूत्रसंचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले..
उपविभागीय कार्यालयात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, सुरज कुमावत, अभियंता श्री.रोडगे, दीपक त्रिभुवन, श्रीमती जऱ्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख , सेवानिवृत्त तलाठी अशोक पवार यांच्यासह कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
नगरपालिकेत मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.या ध्वजारोहण कार्यक्रमास माजी डॉ .दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, माजी नगरसेवक मजीद कुरेशी, उल्हास ठोंबरे, डॉ, निलेश भाटिया, सुप्रिया व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.व्ही.जी.शिंदे, हाजी इम्रान कुरेशी, विशाल संचेती, शैलेश चव्हाण, गौरव दौडे, शैलेश पोंदे,अल्ताफ बाबा, शेख जुबेर, बी.बी.जाधव, एम,आर, गणवीर, रवींद्रआप्पा साखरे,, पारस पेटारे, महेश शिंदे, रामसिंग गोमलाडू यांच्यासह शहरातील नागरिक व कर्मचारी वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments