वैजापूर, ता.15 - 'ऑपरेशन सिंदुर' मध्ये प्रत्यक्ष सहभाग आणि शत्रू च्या विरोधात असाधारण वीरतेचे प्रदर्शन केल्याबद्दल विंग कमांडर देवेंद्र शोभाताई बाबासाहेब औताडे यांना Presidential Vayu Sena Medal Gallentry Award (वायु सेना पदक) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होऊन त्यांना आज भारतीय स्वातंत्र्य दिनी शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. शौर्य पदक मिळाल्याबद्दल विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचे अभिनंदन होत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्व. बाबासाहेब पाटील औताडे यांचे ते सुपुत्र असून वैजापूर तालुक्यातील लोणी गावचे भूमिपुत्र व राज्याचे माजी सहकारमंत्री तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.विनायकराव पाटील (आण्णा) यांचे विंग कमांडर देवेंद्र औताडे हे नातू आहेत. तसेच वैजापूर तालुक्याचे ज्येष्ठ भाऊसाहेब पाटील ठोंबरे यांच्या जावयांचे ते धाकटे बंधु आहेत. ऑपरेशन सिन्दुर मधील कामगिरीबद्दल भारतीय स्वातंत्र्यदिनी विंग कमांडर देवेंद्र औताडे यांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीरामपूर व वैजापूर या दोन्ही तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
0 Comments