news today, शिवना टाकळी धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडले ; पिकांना जीवदान मिळणार

आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने कालव्याला पाणी ; शेतकऱ्यांमध्ये आनंद

प्रभाकर जाधव
----------------------------------                       
गारज ता.14  गेल्या एक ते दीड महिन्यापासून गारा सह परिसरामध्ये पावसाने दडी मारल्याने तोंडी घास आलेले पीके मात्र धोक्यात आली होती म्हणून गारजसह परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार बोरणारे यांच्याकडे धाव घेऊन शिवना टाकळी प्रकल्पामध्ये 80 ते 85 टक्के पाणीसाठा आहे ते पाणी उजव्या कालव्या सोडल्यास पिकांना जीवदान मिळेल हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या पदरात पडेल म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती या अनुषंगाने आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी वेळोवेळी वरिष्ठांबरोबर बोलून उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले म्हणून आज 14 ऑगस्ट रोजी दुपारी 11:30 वाजता शिवना टाकळी प्रकल्पामधून उजव्या कालव्याला 80 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता शिषीर गांजाळे , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक समीर लहाने, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यशवंत चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. रात्री बारा वाजेच्या नंतर सोडण्यात आलेल्या पाण्यात आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे शिवना टाकळी प्रकल्पाचे अभियंता अशपाक यांनी सांगितले. सध्या हे पाणी दहा किलोमीटर पर्यंत पोहोचले असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने कालव्याला पाणी सोडण्यात आले असून परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून आ.बोरनारे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments