today news, वैजापूर नगरपालिका निवडणूक ; 1 जुलै अर्हता दिनांक नुसार 42,391 मतदार

स्थानिक स्वराज्य संस्थेत वाढली मतदारसंख्या...
जिल्हा परिषदसाठी 3 लाख 23 हजार 480 मतदार 


 वैजापूर  ता.05 / प्रतिनिधी - स्थानिक संस्थांच्या स्वराज्य आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्य निवडणूक आयोग तयारीला लागले असून, मतदार यादीसाठी 1 जुलै 2025 ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत विधानसभा निवडणुकीच्या मतदारसंख्येच्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी 1871 व नगर परिषदसाठी 723 मतदार वाढले आहेत.
तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नगरपरिषद व तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यापुर्वी विधानसभा 2024 ची मतदारयादी गृहीत धरण्यात येणार होती. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. वैजापूर जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात विधानसभेसाठी नोव्हेंबर 2024 पर्यंत 3 लाख 20 हजार 502 मतदार होते. त्यामध्ये 2 हजार 978 मतदारांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी विधानसभा निवडणुकीत वाढीव मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. विधानसभा 2024 नुसार ही संख्या 3 लाख 20 हजार 502 होती ती आता 3 लाख 23 हजार 480 ईतकी झाली आहे. वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेत आठ गट असून पंचायत समितींसाठी  सोळा गण आहेत. 

प्रभागनिहाय मतदारयादीची सर्वांनाच प्रतीक्षा...
     वैजापूर नगर परिषदेच्या क्षेत्रात यापूर्वी 41 हजार 668 मतदार होते. त्यामध्ये आता पुरुष 296 तर स्त्री 427 असे 723 मतदार वाढले आहेत. 2017 च्या तुलनेत ही वाढ 1 जुलै 2025 च्या अर्हता तारखेवर निश्चित करण्यात आली आहे. अकरा प्रभागांमधून हे मतदार आगामी निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यात येणार असून त्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.


7 हरकती प्राप्त झाल्या आहेत...

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट, गण प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर यंत्रणेकडे वैजापूर तालुक्यातुन भिंगी, सफियाबादवाडी, रघुनाथपुरवाडी, वाघला, संजरपुरवाडी, पोखरी, जरूळ असे एकूण 7 हरकती प्राप्त झाल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी हालचाली वाढविल्या असून मतदारयादी तयार करण्यास सांगितले आहे. त्यासाठी एक जुलै ही अर्हता तारीख निश्चित केली आहे. यापूर्वी विधानसभा 2024 ला वापरण्यात आलेल्या यादीतील मतदारच ग्राह्य धरण्यात आले होते. मात्र आयोगाने त्यात बदल करून सुधारित यादीनुसार मतदानासाठी मतदार निश्चित करण्यास सांगितले आहे.
सुनील सावंत, तहसीलदार वैजापूर
---------------------

Post a Comment

0 Comments