zp election, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर होण्याची शक्यता

2022 पासून असणारे राखीव जागांचे चक्रीय आरक्षण संपुष्टात  ; नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार 

जफर ए. खान 
--------------------------
वैजापूर, ता.24 - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली असून, उद्या सोमवारी (ता.25) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणका होऊन मुदत संपल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने वाढीव ओबीसी आरक्षणानुसार गट आणि गणांचे आरक्षण जाहीर केले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे वाढीव आरक्षण रद्द करत 2017 च्या 27 टक्के आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन गट आणि गणांचे आरक्षण जाहीर करणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट आणि गणांचे आरक्षण काय निघणार, आपला हक्काचा गट - गण खुला राहणार की आरक्षित होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

आरक्षण सोडत नियमात बदल ; आरक्षण लोकसंख्येवर आधारित असणार...

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा आरक्षण सोडतीमध्ये ग्रामविकास विभागाने असून 2022 पासून असणारे राखीव जागांचे चक्रीय आरक्षण संपुष्टात येणार आहे. यंदापासून नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार असून यासंदर्भात ग्रामविकास विभागाने 20 ऑगस्ट 2025 रोजी नव्याने अधिसूचना प्रसिध्द केली आहे. नवीन आरक्षण सोडतीच्या अध्यादेशाला 'आरक्षण नियम -2025' असे नाव देण्यात आले असून यंदा काढण्यात येणारे आरक्षण हे जिल्हा परिषद गटाच्या लोकसंख्येवर आधारित असणारे पहिले आरक्षण असणार आहे. यामुळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांच्या आरक्षणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामविकास विभागाचे सहसचिव व.मु.भरोसे यांच्याकडून  अधिसूचना प्रसिध्द 

यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आधीच्या पाच पंचवार्षिकमध्ये काढण्यात आलेल्या आरक्षणाचा आधार घेत चक्रीय पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येत असे. यंदा मात्र, ग्रामविकास विभागाने 2002 पासून 2017 पर्यंत काढलेल्या आरक्षणाऐवजी नव्याने गट आणि गणातील सध्याची प्रवर्गनिहाय लोकसंख्या गृहीत धरून आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाचे सहसचिव व..मु. भरोसे यांनी 20 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढली असून यात आरक्षण नियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या  (जागांच्या आरक्षणाची ओढत व चक्रानुक्रम) नियम 2025 असे नाव देण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments