वैजापूर ता.24 / प्रतिनिधी - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शहरातील अयोध्या ग्रुप, महात्मा जोतिबा फुलेनगर (मोंढा मार्केट) यांच्यावतीने शनिवारी (ता.23) रात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कारप्राप्त गायिका पंचशीलाताई भालेराव यांचा अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या विचार व कार्यावर आधारित समाज प्रबोधनात्मक संगीतमय गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सम्पन्न झाला.
पंचशीला भालेराव यांनी उपस्थित महिला, पुरुष व मुलां-मुलींना प्रबोधनात्मक गीत सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माजी नगराध्यक्ष साबेरखान, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील शेठ, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, रियाज शेख, शाहीर अशोक बागूल, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, शिवा थोरात, बाळासाहेब पवार, रवी पगारे, विजय त्रिभुवन, शैलेश पोंदे, गिरीश चापानेरकर, सन्मित खनिजो यांनी पुष्पहार टाकून अभिवादन केले..साबेरखान यांनी पंचशिला भालेराव यांचा सत्कार केला..प्रास्ताविकात धोंडीराम राजपूत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. याप्रसंगी अतिथीच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. अयोध्या ग्रुप,शासकीय गोदाम, राज्य वखार महामंडळ हमाल संघटना तसेच शिवा थोरात, बाळासाहेब पवार, रवींद्र पगारे, किरण पगारे, सागर अस्वले, सोमनाथ आस्वले, गोरख कंनगरे, राजू अपचित्ते, गोरख त्रिभुवन, संजय पवार, दशरथ आस्वले, किशोर सोळसे, तुकाराम गांगुर्डे यांनी सहभाग नोंदविला. सूत्र संचलन राजपूत यांनी केले आभार शिवा थोरात यांनी मानले.
0 Comments