news today, हतनूर येथे पोळ्यात बैल उधळला ; दोन शेतकरी आणि बैल जखमी



कन्नड, ता.24 - बैलपोळा साजरा करताना एक खिल्लारी बैल अचानक उधळल्याने दोन शेतकऱ्यांसह बैल जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता.22) कन्नड तालुक्यातील हतनूर येथे घडली.

बैल पोळ्यानिमित्त गावातील शेतकऱ्यांनी सजवलेले बैल गावाच्या वेशीत आणले होते. बैलाची पूजा सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार व त्यांच्या पत्नी यांच्याहस्ते झाली. त्यानंतर पोळा फोडण्यात आला. यावेळी वैभव कैलास कोतकर यांचा खिल्लारी बैल अचानक उधळला व गावाच्या वेशीत जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या दिशेने धावला.गर्दीतील अनेकांना त्याने तुडवले. त्यानंतर उधळलेल्या अवस्थेत त्याने संरक्षक भिंतीवर उडी मारली.त्यावेळी त्याचा एक पाय कठड्यात अडकून तो थेट मुंडक्यावर पडला. या घटनेत बैलाचे समोरचे दोन्ही पाय मोडले.तर समर्थ ज्ञानेश्वर म्हस्के (वय 12 वर्ष) आणि ज्ञानेश्वर नामदेव झरेकर (वय 38 वर्ष) हे दोघे जखमी झाले.






Post a Comment

0 Comments