news today, गोदावरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या ; चार दिवसानंतर मृतदेह आढळला.

वैजापूर, ता.24/ प्रतिनिधी - तालुक्यातील नागमठाण येथील संतोष वामन गायकवाड (45 वर्ष) याने गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चांदेगाव येथे गुरुवारी (ता.21) घडली. नदीला जास्त पाणी असल्याने शोध घेतल्यानंतर चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह शनि देवगाव शिवारात आढलून आला.


घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निक्षमण दलाचे अधिकारी एस.आर.भगत,   अशोक खांडेकर, एच. वाय.घुगे,  एल. पी. कोल्हे, जवान विशाल घरडे, कमलेश सलामबाद, वाहनचालक एन.आर.घुगे, वाहचक बी.एन. सानप, अग्निक्षमण जवान छत्रपती केकाण, अतुल बनकर, विशाल खर्डे, इरफान शेख यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. शनिवारी देखील कमलपूर बंधाऱ्यावर शोध मोहीम सुरू होती. गोदावरी नदीत मोठा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने चार दिवसानंतर  शनि देवगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला.

Post a Comment

0 Comments