news today, खंडाळा परिसरात जोरदार पाऊस ; पाझर तलाव भरले

ताराचंद वेळंजकर 
------------------------------
खंडाळा ता .23 - वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरामध्ये सोमवारी (ता.22) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खंडाळा परिसरातील सावतावाडी लघुपाझर तलाव व संपूर्ण पावसाळा गेला तरी कोरडाठाक असलेला खंडाळा, पानगव्हाण पाझर तलाव तुडुंब भरले असून सांडव्यातून धो धो पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे

खंडाळा परिसरातील सावतावडी व पानगव्हाण पाझर तलाव भरले असून सांडव्यातून पाणी वाहत आहे..

पावसाळा सुरू होऊन जवळपास चार महिन्याचा कालावधी होत आला तरी खंडाळा परिसरामध्ये पिकापुरताच पाऊस पडत होता पीकही जमत होती मात्र एकही असा जोरदार पाऊस न झाल्याने पाझर तलाव हे तहानलेलेच होते. मात्र सोमवारी (ता.22) रात्री झालेल्या जोरदार पावसाने सावतावाडी लघु पाझरताला व खंडाळा पानगव्हाण पाझर तलाव रात्रीतून तुडुंब भरले असून सांडव्यामधून धो धो पाणी वाहताना पहावयास मिळत आहे 
पाझर तलाव भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला असून पुढील काळात गहू, उन्हाळ कांदे, उन्हाळी मक्का आधी पिकांची पेरणी होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे
खंडाळा परिसरातील सावतावाडी पाझर तलाव तुडुंब भरला असून मागील रिमझिम झालेल्या पावसामुळे उपळटाच्या पाण्यामुळे 30 ते 40 टक्के पाणी साठले होते, मात्र सोमवारी झालेल्या पावसामुळे तुडुंब भरले आहे

Post a Comment

0 Comments