news today, खंडाळा येथे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव


खंडाळा, ता.23/ प्रतिनिधी - जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवानिमित्त मातोश्री दादाश्रम प्रतिष्ठाण व विघ्नहर्ता @zp 96 ग्रुप खंडाळा ता वैजापूरच्यावतीने खंडाळा येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


या मोहत्सव मध्ये महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार यांचा समावेश आहे. या कीर्तन महोत्सवाला 25 सप्टेंबर रोजी सुरुवात होणार असून रोज रात्री आठ ते दहा या वेळामध्ये होणार आहे असून या किर्तन महोत्सवाची सांगता सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी  होणारआहे.

गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी ह.भ.प. वर्षाताई म्हस्के (लासुरगाव), दिनांक 26 ह.भ.प. अश्विनीताई गुडघे (नांदगाव), दिनांक 27 ह.भ.प. मोनिकाताई येवले (येवला), दिनांक 28 ह.भ.प. सरलाताई जोंधळे (संगमनेर), दिनांक 29 ह.भ.प. अश्विनीताई कदम (छत्रपती संभाजीनगर) ,दिनांक 30 ह.भ.प. अस्मिताताई सांगळे (नाशिक),दिनांक 1 ऑक्टोबर ह.भ.प. सरलाताई वाघ (जळगाव खान्देश), दिनांक 2 ह.भ.प.. धनश्रीताई शिंदे (भडगाव खान्देश) दिनांक 3 ह.भ.प. इंद्रायणीताई मोरे (मालेगाव,  दिनांक 4 ह.भ.प. साक्षीताई मुळे (जालना), दिनांक 5 ह.भ.प. सत्यभामाताई भुजंग (डोंबिवली), दिनांक 6 समाप्ती कीर्तन ह भ प सत्यभामाताई भुजंग (डोबिवली) यांचे होईल. सदरील महोत्सवसाठी  शिवसेना नेते   शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे,  माजी जिल्हा परिषद अध्यक्षा  लताताई पगारे, उद्योजक पांडुरंग पवार खंडाळकर, बाळासाहेब जाधव नाशिककर, युवासेना जिल्हा समन्वयक उमेश पाटील शिंदे,  तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहर प्रमुख प्रकाश चव्हाण, तालुका संघटक मनोज गायके, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अक्षय साठे, अनिल न्हावले, विभाग प्रमुख संतोष निकम, उप संघटक बाळासाहेब मिसाळ, उपविभाग कैलास बहाळस्कर, यांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या किर्तन महोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments