नारंगी धरणाचे दोन दरवाजे उघडून त्याद्वारे 72 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे
पावसाळा सुरू झाला तेंव्हापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने नारंगी धरणात अत्यल्प प्रमाणात पाण्याची आवक सुरु होती. ऑगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे धरणात 30 ते 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. सप्टेंबर महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली व धरणात 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरणात 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक सुरुच असल्याने आज सायंकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडून त्याद्वारे 72 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
नारंगी धरण भरल्यामुळे वैजापूर शहर व परिसरातील नांदगांव, चांडगाव, घायगाव, भगगाव, रोटेगाव यासह 14 चौदा गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
0 Comments