news today, धोंदलगाव येथे 13 कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता काँक्रीटीकरण कामाचे आ.बोरणारे यांच्याहस्ते भूमिपूजन




वैजापूर, ता.22 - तालुक्यातील मौजे धोंदलगाव येथे 13 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर करून आणलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते सोमवारी (ता.22) पार पडला.
 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील राज्य मार्ग 725-1 ते धोंदलगाव ते अमानतपूरवाडी रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण या कामासाठी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 13 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या रस्ता सिमेंट काँक्रिटकरण कामाचे भूमिपूजन आ. बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, माजी सभापती भगिनाथ मगर, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, सुभाष पाटील तांबे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ वाहतुकीसह विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
.


Post a Comment

0 Comments