वैजापूर, ता.22- वैजापूर तालुक्यातील गंगथडी भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी खासदार संदीपान भुमरे व आ.रमेश पाटील बोरणारे यांनी (सोमवारी ता.22) केली.. तसेच नैसर्गिक आपत्तीबाबत तत्काळ आढावा बैठक घेतली. आपदग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दरम्यान माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, तालुका कृषी अधिकारी ठक्के, नायब तहसीलदार महाजन, कुमावत, जिल्हा परिषद उपकार्यकारी अधिकारी सातपुते, महावितरण उपकार्यकारी अभियंता पांडव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहरी जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांच्यासह शेतकरी बांधव व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
0 Comments