वैजापूर, ता.22- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) विविध सेलची जिल्हा आढावा बैठक छञपती संभाजीनगर येथे नुकतीच पार पडली. बैठकीत पक्षाची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत 26 जिल्हा उपाध्यक्षांसह सरचिटणीस व सचिवांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मतभेद विसरून एकदिलाने काम करावे असे आवाहन आ.चव्हाण यांनी केले. बैठकीत नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये हाजी अकील सेठ, संतोष कोल्हे, ज्ञानेश्वर सिदलंबे, नासेर पटेल , अनिल चव्हाण, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर दुधारे यांच्यासह 26 जिल्हा उपाध्यक्षांचा समावेश आहे. महेश उबाळे, सुधीर माने, अशोक गायकवाड, दत्ता पाटील, बाळासाहेब भोसले, आप्पासाहेब निर्मल, नितीन धुमाळ यांचा यांच्यासह 19 जिल्हा सरचिटणीस तर मुश्ताक पटेल, ॲड. प्रताप निंबाळकर, नईम पटेल, भगवान कामठे, नंदू सोनवणे, महेश खेडकर, कारभारी गायके, बाळासाहेब शेळके, रणजित देशमुख, राहुल डकले, समीर पटेल आदींसह 37 जिल्हा सचिव अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीस नितीन पाटील, दिलीप बनकर,अभिजित देशमुख,संजय जाधव आदींची उपस्थिती होती. 
 
0 Comments