कमलाकर रासने
---------------------------
महालगाव ता.21- वैजापूर - श्रीरामपूर तालुका हद्दीवरील गोदातीरांवर शनिदेवगांव सप्तक्रोशी येथे 30 जुलै ते 06 ऑगस्ट दरम्यान " न भुतो न भविष्यती " 25 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलेल्या योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वज अवतरण सोहळा सोमवार दि.22 सप्टेबर रोजी सकाळी 10 वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रमुख मान्यवर पाहुण्यांचे ऊपस्थितीत संपन्न होणार आहे.
शनिदेवगांव सप्तक्रोशी योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज 178 व्या सप्ताह मैदानावर हा ध्वज अवतरण सोहळा आज सोमवार दि.22 रोजी सकाळी 10 वाजता सप्ताह कमेटी अध्यक्ष तथा श्रीक्षेत्र सरालाबेट गोदाधाम मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते व खा.संदीपान भुमरे, आ.रमेश पाटील बोरणारे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड, खासदार संदिपान भुमरे, पंचगंगा ऊद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे ,भाजपा जिल्हा ऊपाध्यक्ष अविनाश गलांडे या प्रमुख मान्यवरांच्या ऊपस्थितीत होणार आहे. या ध्वज अवतरण सोहळ्यास शनिदेवगांव सप्तक्रोशितील
शनिदेवगांव, बाजाठाण, अवलगांव, हमरापूर, चेंडुफळ भामाठाण कमालपूर या गावासह परिसरातील महालगाव, घोगरगांव, नागमठाण, गाढे पिंपळगांव, नेवरगांव, वाहेगाव, डागपिंपळगाव, जातेगाव टेंभी, वक्ती, पानवी, शिरजगाव आदी गावोगावच्या नागरिकांनी सप्ताहामध्ये परिश्रम घेतलेल्या सर्व तरूण मंडळांनी ऊपस्थित रहावे असे आवाहन सप्ताह कमेटी सदस्यासह ऊपाध्यक्ष हरिशरणगिरी महाराज यांनी केले आहे.
ध्वज अवतरण सोहळा दिनी सप्ताहातील
पूर्ण जमाखर्च हिशोब देण्याची परंपरा ....
अहिल्यानगर , छ.संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात फिरता नारळी सप्ताह म्हणून पावणे दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र सरालाबेट गोदाधामच्या योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज सप्ताह स्थळ पंचक्रोशी गावाची व्याप्ती मोठी असते.या सप्ताहात समावेश असलेल्या गावा व्यतिरिक्त वरील तीन जिल्ह्यात गावोगावच्या भक्तमंडळाकडे देणगी पावती पुस्तके वाटप केलेली असतात. ही देणगी पावती पुस्तके सप्ताहानंतर कमेटीकडे जमा होण्यास महिना दिड महिन्याचा विलंब लागतो.यानंतरच अंतरिम जमाखर्च हिशोब ताळेबंद पुर्ण झाल्याखेरीज ध्वज ऊतरविला जात नाही. यापरंपरेसह शिल्लक रक्कम श्रीक्षेत्र सरालाबेट देवस्थानच्या विकास कामासाठी सरालाबेट ट्स्टकडे सुपुर्द करण्याचीही प्रथा आहे.
0 Comments