news today, झेडपी - पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता दिवाळीपूर्वी ?



मुंबई, ता.21 -  राज्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षण व प्रभाग रचनेबाबत नागपूर, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी होऊन त्या फेटाळण्यात आल्याने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाकडून महसूल विभागनिहाय ऑनलाईन बैठका घेऊन ईव्हीएम, मतदान केंद्रे, मनुष्यबळ, अधिकाऱ्यांची रिक्त पदे याचा आढावा घेण्यात आला आहे. निवडणूक तयारीच्या कामाने वेग घेतला असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट आणि गणांसाठी लवकरच आरक्षण सोडत काढली जाणार आहे .त्यानंतर दिवाळीच्या आतबाहेर निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments