नाशिक, ता.21- त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांवर प्रवेश शुल्कावरून ठेकेदाराच्या माणसांनी अमानुष मारहाण केली. या घटनेत पत्रकार किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पत्रकार संघासह सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू - महंतांच्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी शनिवारी (ता..20) सकाळी नाशिकमधील वृत्तवाहिन्यांचे पत्रकार व कॅमेरामन त्र्यंबकेश्वर येथे गेले होते.तेथील स्वागत कमानीजवळ बाहेरील वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारले जाते. पत्रकारांना दिवसात अनेकदा यावेजावे लागत असल्याने त्यांच्याकडून हे शुल्क घेतले जात नाही . आज वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची वाहने अडवून ठेकेदाराच्या लोकांनी जबरदस्तीने वसुली सुरू केली. पत्रकार असल्याची ओळख देताच अर्वाच्य शिवीगाळ केली. योगेश खरे,अभिजित सोनवणे यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली.
0 Comments