news today, त्र्यबंकेश्वरचा 'तो' टोल नाका बंद ; पत्रकारांना मारहाणीच्या घटनेनंतर निर्णय




नाशिक, ता.22 - त्र्यंबकेश्वर येथे वाहन शुल्क वसुली दरम्यान पत्रकारांना शनिवारी (ता.20) झालेल्या मारहाणीचे पडसाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत उमटले. त्यामुळे शहरातील तो 'टोल नाका' तातडीने बंद करण्याची वेळ त्र्यंबक नगर परिषद प्रशासनावर आली. संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन तातडीने ही वसुली थांबविण्यात आली आहे. तसेच अटी - शर्तीचा भंग केल्याच्या कारणाखाली ठेका रद्द करण्याचे संकेतही नगर परिषद प्रशासनाने दिले आहेत. साधारणतः 40 वर्षांपूर्वी त्र्यंबक नगर परिषदेने या वाहनतळ शुल्क वसुलीस सुरुवात केली होती.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू - महंतांच्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी शनिवारी (ता..20) सकाळी नाशिकमधील वृत्तवाहिन्यांचे पत्रकार व कॅमेरामन त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. तेथील स्वागत कमानीजवळ बाहेरील वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारले जाते. पत्रकारांना दिवसात अनेकदा यावेजावे लागत असल्याने त्यांच्याकडून हे शुल्क घेतले जात नाही. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची वाहने अडवून ठेकेदाराच्या लोकांनी जबरदस्तीने वसुली सुरू केली. पत्रकार असल्याची ओळख देताच अर्वाच्य शिवीगाळ केली.या घटनेत किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले तर योगेश खरे, अभिजित सोनवणे यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments