वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या 21 जनावरांच्या नुकसान भरपाईपोटी 7 लाख 10 हजार रुपयांचा निधी वाटप
वैजापूर, ता.26- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत वैजापूर नगरपरिषदेत “सेवा पंधरवाडा” निमित्त विविध योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश व मंजुरी आदेश वितरण सोहळा गुरुवारी (ता.25 उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व आमदार रमेश पाटील बोरणारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
.
या कार्यक्रमात शेतकरी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत तालुक्यातील 17 शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 2 लाख प्रमाणे एकूण रुपये 34 लाखांचे मंजुरीपत्र जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते देण्यात आले.
.
स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा ही योजना शेतकऱ्यांच्या शेती करताना होणारे अपघात, विजेचा धक्का, सर्पदंश, पाण्यात बुडणे, रस्ता अपघात, वीज पडणे इत्यादीमुळे मृत्यू झाल्यास शेतकरी कुटुंबांना दिलासा देते. या योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारास सानुग्रह अनुदानाचा लाभ घेता येतो असे आमदार बोरणारे यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
.
शेतकऱ्यांना जनावरांचीही नुकसान भरपाई....
तालुक्यात पावसाळ्यामध्ये वीज पडून 21 जनावरे मयत झाली होती. यासाठी प्रत्येकी गायीला रुपये 37,500 व बैलाला 32,000 रुपये प्रमाणे एकूण रुपये 7 लाख 10 हजार रुपयांचे धनादेशही यावेळी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. आमदार बोरणारे यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी भागवत बिघोत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, डॉ.राजीव डोंगरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
0 Comments