वैजापूर ता.26 - महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात "स्वस्थ नारी-सशक्त परिवार" या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (ता.26) महिला आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य रणजित चव्हाण, संजय पाटील बोरणारे, अबोली बोरणारे व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन.मोरे यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन.मोरे होते. उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपमाला मरमट, डॉ.गीते, डॉ.साळुंके, डॉ.फरहा, मुख्य परिचारिका विद्या मोहाडीकर, रुख्मिणी गवई, श्रीमती जंगम सिस्टर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात उपस्थित महिलांची आरोग्यतपासणी करण्यात आली. निरोगी जीवन आणि पोषण शैली, रक्तदाब, मधुमेह, नेत्र व दंत रोग तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. "आरोग्य ही संपत्ती"आहे म्हणून वारंवार आरोग्य तपासणी करून तसेच आहार ही वेळेनुसार व योग्य घेऊन महिलानी स्वस्थ व निरोगी जीवन जगावे व परिवार ही निरोगी व स्वस्थ ठेवावा असे आवाहन धोंडीरामसिंह राजपूत यांनी यावेळी केले. अबोली बोरणारे यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. अत्यंत बहारदार उत्तम आरोग्यसाठी काही सुभाषिते सांगत कार्यक्रम संचलन क्ष-किरणतज्ज्ञ विभागप्रमुख किशोर वाघुले यांनी केले. प्रास्ताविक शीतल बोढरे यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम उचित, किरण चौधरी, निलेश चाफेकर, छाया केदारे, शशिकांत पाटील, श्रीमती पाटील, मनीषा मुळे, बापू वाळके, राहुल मापारी, दुधारे, कंठेवाडकर, लक्ष्मीकात दुबे यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास ग्रामीण भागातील महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या. मेळाव्यात रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्स स्टाफ,आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments