news today, न्यू हायस्कूल तलवाडा येथे एच.आय.व्ही.एड्स जनजागृती अभियान संपन्न



लोणी खुर्द, ता 25 /प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील न्यू हायस्कूल तलवाडा येथे बुधवारी (ता.24) एडस जनजागृती अभियान संपन्न झाले. या कार्यक्रमांतर्गत समुपदेशक डॉ.विजय पाटील व डाॅ.बापू वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मुख्याध्यापक नरेंद्र पोटे यांच्या उपस्थितीत एडस (HIV) 
जनजागृती कार्यक्रम न्यू हायस्कूलमध्ये राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत समुपदेशक डॉ. बापू वाळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राज्यामध्ये HIV एडस या आजारांतर्गत मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एचआयव्ही बाधित रोगांची संख्या वाढत आहे. HIV हा विषाणू आहे. जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर गंभीर आजार होतो. एच.आय व्ही चा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंध, निर्जंतुक नसलेली सुई वापरणे किंवा दूषित रक्त संक्रमणाने होऊ शकतो या संसर्ग रोगापासून स्वतःचा बचाव करणे आणि HIV असलेल्या लोकांना आदर व सन्मानाने वागवणे याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे.. असे ते म्हणाले..याप्रसंगी डॉ.विजय पाटील यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याविषयी मोलाचा सल्ला दिला.
यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र पोटे, शिक्षक टी.व्ही.शिरसाठ, आर.एस.सरोवर, एस.आर.गायकवाड, एम.जी.येवतीवाड, श्रीमती वाय.बी.भदाने, आर.डी.जोर्वेकर, अशोक मछले, अशोक गायकवाड, बापू चन्ने, हसन सैय्यद, शंकर चव्हाण यांच्यासह विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments