news today, वैजापूर नगरपालिकेत 'सेवा पंधरवडा' अंतर्गत प्रधानमंत्री पथविक्रेता 'लोक कल्याण मेळावा' संपन्न

वैजापूर, ता.25 - प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेला वर्ष 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन यांनी या योजनेअंतर्गत सूचित केल्याप्रमाणे 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत "लोक कल्याण मेळावा" घेऊन त्याची माहिती पथविक्रेत्यापर्यंत पोहचावी म्हणून वैजापूर पालिकेने गुरुवारी (ता,२५) "लोक कल्याण मेळावा"आयोजित करून उपस्थित पथ विक्रेत्यांना माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रमेश पाटील बोरणारे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते. वैजापूर नगर परिषदअंतर्गत टप्पा प्रथम निधी दहा हजार, (लाभार्थी एक हजार चौदा), द्वितीय टप्पा निधी वीस हजार (लाभार्थी 253) तृतीय टप्पा निधी पन्नास हजार (लाभार्थी 47) आहेत. वर्ष 2030 पर्यंत ही रक्कम वाढीव रुपात मिळणार आहे. याचा लाभ पथविक्रेत्यांनी घ्यावा व आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन आ, बोरणारे यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आ.बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांच्याहस्ते नुकत्याच नैसर्गिक आपत्तीत पशुधन गमावलेल्या शेतकरी  व नागरिकांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शेतकऱ्यांना धीर देत आश्वासन दिले की, पावसाने झालेल्या नुकसानीची दखल शासनाने घेतली असून शासनाकडे मदतीची मागणी केलेली आहे..या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत,नायब तहसीलदार कुमावत, पेशकार पारस पेटारे, मुख्याधिकारी भागवत बिघोत, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.

नुकत्याच नैसर्गिक आपत्तीत पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याचे धनादेश देतांना जिल्हाधिकारी स्वामी, आ.रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, डॉ, उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत ...

प्रास्ताविक मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले. 'स्वनिधी से समृद्धी' अंतर्गत शासनाच्या आठ योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येतो असे त्यांनी विशद केले. माजी नगराध्यक्ष साबेर खांव  शिल्पाताई परदेशी यांची समयोचित भाषणे झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी यांच्याहस्ते नियुक्ती पत्रही देण्यात आले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहरी जाधव, भागीनाथ मगर, दशरथ बनकर, गोकुळ भुजबळ, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरेशी यांच्यासह प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत, समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन, साठे,  जारवाल,  मुळे, मंगेश नाईकवाडी, शंकर जोरे, अरुण कुलकर्णी, गणेश टिभे 
यांच्यासह  बचत गटाच्या महिला, पथविक्रेते, पालिका कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. आभार सुनील भाग्यवंत यांनी मानले.



Post a Comment

0 Comments