आजच्या विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडविण्यासाठी सर्वकष प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी--दिलीप स्वामी
वैजापूर ता. 25 - आज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व कौटुंबिक गुणवत्ता कमालीची ढासळत आहे ही सावरण्यासाठी शिक्षक,पालक व समाज यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी अभ्यासासोबत संस्कारक्षम, स्पर्धाक्षम, आरोग्यक्षम गुणात्मकक्षम घडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी (ता.25) वैजापूर येथे विद्यार्थी अभ्यासिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्या नगरविकास विभागांतर्गत आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या निधीतून ही अभ्यासिका साकारली आहे.
यावेळी संबोधित करताना जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हा खरा विकास असतो, त्यामुळे
विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेतून आपली गुणवत्ता वाढवून बौद्धिक विकास करावा व जीवनाचे उच्च ध्येय गाठून आई -वडिलांचा वृद्धापकाळात योग्य सांभाळ करावा. आ.बोरणारे यांच्याविषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आ.बोरणारे हे दूरदृष्टी असणारे लोकप्रतिनिधी असून विकास कामे करून घेण्यात ते जिल्ह्यात नंबर एकचे आमदार आहेत. ईतर सर्व विकासासोबत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षा देऊन उच्चपदस्त अधिकारी व्हावे म्हणून त्यांनी पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर या मोठ्या शहरांच्या धर्तीवर ही अभ्यासिका उभारली. त्यांच्या या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी यश द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
आ.बोरणारे यांनी आपल्या भाषणात त्यांच्या विद्यार्थी जीवनाविषयी माहिती देऊन तालुक्यातील विद्यार्थ्यांवर अशी पाळी येऊ नये, त्यांना अभ्यासासाठी सुसज्ज अशी अभ्यासिका असावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून 'स्टडी सेंटर' साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून 1 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. 60 मुले व 40 मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेली व वाचनालयात विविध स्पर्धात्मक व अभ्यासक्रम पुस्तके असलेली ही अभ्यासिका आईबाबांचे मुलांसाठी असलेले स्वप्न साकार करेल असेही आ, बोरणारे यावेळी म्हणाले.
या विद्यार्थी अभ्यासिका लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते. माजी नगराध्यक्ष साबेरखान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले. तर सूत्र संचलन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.
या प्रसंगी उपविभागीय डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, उपअभियंता अजित रोडगे, डॉ.राजीव डोंगरे, गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर, डॉ.एस.एम.जोशी, बाबासाहेब जगताप, राजेंद्र पाटील साळुंके, ॲड.प्रमोद जगताप, ॲड. महेशकदम, दशरथ बनकर, विशाल शेळके, प्रशांत त्रिभुवन, भरत कदम,ॲड. प्रतापराव निंबाळकर, रामहरी जाधव, भागीनाथ मगर, प्राचार्य वैद्य, अमोल बोरनारे, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, गोकुळ भुजबळ, सचिन पवार, सुरेंद्र सुतवणे, ज्ञानेश्वर टेके, गौरव दौडे, महेश बुणगे, निशा गोरक्ष, संगीता आहिरे, छाया बोरनारे, सुप्रिया व्यवहारे, सुनीता साखरे, अनिता दाणे, प्रमोद कुलकर्णी, श्रीकांत साळुंके, एल.एम.पवार, डॉ.संनोष गंगवाल यांच्यासह शालेय विद्यार्थी, प्राध्यापक, पालक उपस्थित होते.
0 Comments