news today, खंडाळा येथे आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा संपन्न ; 32 संघांचा सहभाग


एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली (छत्रपती संभाजी नगर) चा संघ विजेता 

वैजापूर, ता.16-  श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचालित, कृषि महाविद्यालय, खंडाळा येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी पार पडली. यामध्ये मराठवाड्यातील विविध कृषि व कृषि संलग्न महाविद्यालयांच्या जवळपास 32 संघांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये 448 खेळाडू व त्यांचे संघ प्रमुख यात सहभागी झाले होते.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.उदयसिंह वेदप्रकाश पाटील (व्यवस्थापकीय संचालक, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ, छ. संभाजीनगर) हे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. राजेश कदम (विद्यार्थी कल्याण अधिकारी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री अश्रुबा घाडगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साई जनविकास प्रतिष्ठान छ. संभाजीनगर), डॉ. एस. एस. शृंगारे (सहाय्यक प्राध्यापक व क्रीडा अधिकारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी), मा. श्री अमर शेजुळ (कॅम्पस प्रभारी, श्री साई जनविकास प्रतिष्ठान, खंडाळा) व मा. रमेश भालकर (प्रशासकीय अधिकारी, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ, कृषि महाविद्यालय, गेवराई तांडा, छ. संभाजीनगर) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे विनीत मा. डॉ. एम. के. घोडके (प्राचार्य, कृषि महाविद्यालय, खंडाळा) डॉ. जी. के. बहुरे (उपप्राचार्य, कृषि महाविद्यालय, खंडाळा) हे होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. एस. एल. चोपडे (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, कृषि महाविद्यालय, खंडाळा), श्री. टी. बी. नगरे (प्रशासकीय अधिकारी, श्री साई जनविकास प्रतिष्ठान, कृषि महाविद्यालय, खंडाळा), प्रा. आर. एम. पठाण (क्रीडा अधिकारी, कृषि महाविद्यालय, खंडाळा), प्रा. एन. वाय. गायकवाड (क्रीडा अधिकारी, कृषि महाविद्यालय, खंडाळा) व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेतले. 

स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कबड्डी असोसिएशन छ.संभाजीनगर, महाराष्ट्र येथील नऊ पंच होते, या स्पर्धे मध्ये एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर हा संघ विजेता ठरला तसेच डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषि महाविद्यालय, पाथरी, ता. फुलंब्री हा संघ उपविजेता ठरला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सर्व मान्यवरांनी डॉ.चोपडे एस. एल. व प्रा.पठाण आर. एम. यांनी उत्कृष्ट कॉमेन्ट्री केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार केला व सर्व प्रेक्षक वर्गाने त्यांच्या कॉमेन्ट्री चा आनंद घेतला, सूत्रसंचालन डॉ. समाधान चोपडे तर आभार प्रदर्शन प्रा.अश्विनी भोसले यांनी केले.

Post a Comment

0 Comments