news today, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ट वकील सिध्दार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे, ता.16 - सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिध्दार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी (ता.15) रात्री दुःखद निधन झाले. न्यायालयात असतानाच चक्कर आल्याने शिंदे यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी त्यांचे वय 48 वर्ष होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री आण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होत.

                           ॲड. सिध्दार्थ शिंदे 

मूळचे श्रीरामपूर येथील रहिवाशी असलेले सिध्दार्थ शिंदे यांचे कुटुंबीय अनेक वर्षापासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. सिध्दार्थ शिंदे यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची उत्तम समज आणि सखोल संवैधानिक ज्ञान होते. अत्यंत संयत व सोप्या पद्धतीने विश्लेषण करणारे संविधान विश्वलेषक वकील म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.









Post a Comment

0 Comments