आमदार बोरणारे दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व
-- पालक मंत्री संजय शिरसाठ
प्रभाकर जाधव
-------------------------
गारज, ता.26 - वैजापूर तालुक्यातील झोलेगाव पाटी येथे 5 कोटी 87 लाख रुपयाच्या सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता.26) जिल्हयाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रमेश पाटील बोरणारे होते.
राज्य मार्ग 752-H झोलेगाव पाटी ते झोलेगाव या 3 किलोमीटर सिमेंट रस्ता काॅंक्रिटीकरण कामासाठी आमदार रमेश बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नातून 5 कोटी 63 लाख रुपयाच्या निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याहस्ते आज थाटात पार पडले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट हे आपल्या भाषणात म्हणाले की, आमदार बोरणारे म्हणजे विकासाची दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आहे म्हणूनच तालुक्याचा कायापालट झाला आहे. 62 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांवर असलेले रामकृष्ण गोदावरीचे कर्ज माफ करण्याची किमया आ.बोरणारे यांनी केली. वैजापूर तालुक्यातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याला जोडण्याचे कामही त्यांनी केले. हर घर नळ योजना पूर्ण केली असून शेतीसाठी सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहे.
गावागावात कोट्यावधी रुपयांची कामे सद्यस्थितीत चालू असून यात विपाशन केंद्र (बौद्ध विहार) असेल सभा मंडपाचे कामे असेल यासारखी असंख्य कामे आ.बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने होत आहे. भविष्य काळासाठी बोरणारे यांच्यासारख्या हुशार आणि बुद्धिवंत लोकप्रतिनिधींना सांभाळण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ आपल्या भाषणात म्हणाले.
आमदार बोरणारे म्हणाले की, मतदार संघातील विकासाच्या कामासाठी मी कुठलेही राजकारण न करता माझा तालुका माझी जबाबदारी म्हणून सतत 18 तास काम करत असतो त्यातूनच तालुक्याचा विकास होत असल्याचे आमदार बोरणारे म्हणाले
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, राजेंद्र साळुंके, संजय निकम, डॉ. राजीव डोंगरे, भरत कदम, पी. एस.कदम, प्रकाश शिंदे ,सरपंच जयश्री काकडे, जनार्दन काकडे, उपविभागिय अधिकारी अरुण जऱ्हाड,, तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, मंडळ अधिकारी अभय साब्दे, ग्रामसेविका पाटील, प्रभाकर जाधव, मनुरचे सरपंच नितीन साळुंके, पी.एस कदम, आमोल बोरनारे, आनंद निकम, संदिप बोर्डे , ललित सुराशे, नरेंद्र सरोवर, सुनिल शेळके, गोरख चव्हाण, चंद्रकांत पवार, सुदाम गोरे, बाळासाहेब जाधव, शरद भोपळे, बाळासाहेब चेळेकर आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
राज्य मार्ग 26 टूणकी ते आंचलगाव - बल्हेगाव या 7 कोटी 74 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचे व शिऊर येथे 1 कोटी रुपये खर्चाच्या बौध्द विहार व सांस्कृतिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन ही पालक मंत्री संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.
0 Comments