news today, वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या - राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

वैजापूर, ता. 26 - मागील काही दिवसांपासून तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह जनावरे व घरांचे मोठे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना. दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल शेळके 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात श्री.शेळके यांनी म्हटले आहे की,  वैजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अतीवृष्टीमुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत. घरे व  जनावरांच्या आश्रयस्थानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका, कापूस, सोयाबीन, बाजरी, भुईमूग ही खरीप पिके पिके पूर्णपणे नष्ट झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सद्यस्थितीत प्रशासनाकडून पंचनामाचे कामे सुरू आहे परंतु ते अत्यंत संथगतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
 वैजापूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने व्हावे यासाठी प्रशासनाला तातडीने निर्देश देऊन पंचनामे प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात यावी व बाधित शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मिळणारी आर्थिक मदत लवकरात लवकर वितरित करण्यात यावी अशी मागणी श्री शेळके यांनी निवेदनात केली आहे.

Post a Comment

0 Comments