मुंबई, ता 02 - मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ओबीसी नेत्यांची मुंबईत सोमवारी (ता.01) राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला कडाडून विरोध करण्यात येईल. त्यासाठी मोर्चे, उपोषण करण्यात येईल. गरज वाटल्यास मुंबईतही आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भुजबळ यांनी दिला.
ओबीसी नेत्यांची बैठक झाल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली. ओबीसी समाज आता उपोषण करणार आहे. प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून काढण्यात येणार असून आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोंच्या संख्येने मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही, असे भुजबळ म्हणाले. ओबीसीमध्ये 374 जाती आहेत त्यामुळे मराठा समाजाला आमच्यामध्ये टाकू नका एवढीच आमची मागणी आहे, अशी मागणी करतानाच, ब्राह्मण, मारवाडी समाजातील शेतकरी आहेत, त्यांना शेती आहे म्हणून त्यांनाही कुणबी म्हणायचे का ? असा प्रश्न ही भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.
0 Comments